बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:20 PM2019-10-12T13:20:57+5:302019-10-12T13:24:11+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

 Success in rescuing Chimurdi from cavalry attack | बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

Next

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे काही महिन्यांपुर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात सुकदेव सायखेडे यांच्या गायीवर या बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. सदर बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी चक्क गावात येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. यानंतर सदर घटनेची माहिती कर्पे यांनी दुरध्वनीवरून वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डोमसे व वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शालीनी पवार, श्रीमती साबळे यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे कर्पे यांनी सांगितलेÞ.घटनास्थळी बाळू कर्पे, दत्तु काजळे, मुकुंदा यंदे, सुरेश मुसळे आदीसह वनविभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
---------------
वासराचा फडशा, गायी दोरखंड तोडून पळाल्या
राञीच्या दोन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने एक वासरू ठार झाले तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले.यानंतर सकाळी येथील कर्पे हे आपल्या गोठ्यात गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.तर शेतकर्यांनी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे या परिसरात बिबट्या हल्ला करत आहे तर शेतकर्यांनी आपल्या जनावरांना निवा-याची सोय करावी त्यामुळे बिबट्या हल्ला करणार नाही असे यावेळी वनविभागाने शेतकर्यांना माहिती देतांना सांगितले.

Web Title:  Success in rescuing Chimurdi from cavalry attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक