अतिकुपोषित बालकाला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:31 AM2018-01-23T00:31:31+5:302018-01-23T00:32:29+5:30

तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहºयावर हसू उमटू लागले.

Success in saving a child | अतिकुपोषित बालकाला वाचविण्यात यश

अतिकुपोषित बालकाला वाचविण्यात यश

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहºयावर हसू उमटू लागले.  कुपोषण मुक्तीच्या या सामाजिक कार्यात यश आल्याने फोरमच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे, असे असताना प्रमोद गायकवाड यांनी या चळवळीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार मानत यापुढेही कार्य चालू राहणार असल्याचे सांगत एका बालकाला मरणाच्या दारातून परत आणण्याचा आनंद झाला असल्याचे सांगितले.  सोशल नेटवर्किंग फोरमने नाशिकच्या बालरोग तज्ज्ञ संघटना, आयएमए, नाशिक शाखा, केमिस्ट अ‍ॅॅण्ड यांना सोबत घेत तालुक्यातील वैैैद्यकीय अधिकारी वर्ग व फोरमच्या टीमच्या साथीने कुपोषण विषयावर काम करायचे ठरविल्यानंतर तालुक्यात कुपोषित बालके तपासणी करत असताना फणसपाडा येथे छगन ढोले हे बालक अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत सापडलं. गेले २०-२५ दिवस हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि उपक्रमातील सक्रिय सदस्य डॉ. तृप्ती महात्मे, डॉ.दीपा जोशी मॅडम, फोरमचा व्यवस्थापक सचिन शेळके व अन्य सहकाºयांनी वैयक्तिक लक्ष देऊन उपचार केले. त्याला पूरक आहार दिला. परिणामस्वरूप गेल्या २० दिवसात छगनचं वजन ३ किलोने वाढून साडेआठ किलो झाले आणि तो हसू खेळू लागला. काल छगनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याचा हसरा चेहरा पाहून आनंद ओसंडून वाहत होता. 
वयाच्या मानाने अपेक्षित असलेल्या वजनापेक्षा केवळ साडेपाच किलो होतं. डोळे उघडता येतील इतकेही त्राण त्याच्यात नव्हते. सोबत न्यूमोनिया, कान फुटलेले असे अन्य आजार असल्याने छगनला अधिक उपचारासाठी अ‍ॅडमिट केलं नाही तर दगावेल, असे डॉ. सुलभा पवार यांनी सांगितले. सर्व खर्च करण्याची तयारी दाखवत फोरमच्या सभासदांनी त्याच दिवशी अंगावरच्या कपड्यांनिशी स्वत:च्या गाडीत टाकून मविप्र कॉलेज हॉस्पिटलला छगनला अ‍ॅडमिट केले. कपडे, जेवणाची सोय केली. त्याच दिवसापासून छगनवर उपचार सुरू झाले. लागणारी सर्व औषधं पुरवली.

Web Title: Success in saving a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.