प्रज्ञा शोध परीक्षेत सेवा इंग्लिश स्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:56+5:302020-12-22T04:13:56+5:30
----- नाताळसाठी सजली मालेगावची बाजारपेठ मालेगाव : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेवपलेल्या नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली आहे. ख्रिश्चन बांधवांची ...
-----
नाताळसाठी सजली मालेगावची बाजारपेठ
मालेगाव : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेवपलेल्या नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली आहे. ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरू झाली आहे. रंगरंगोटी, फराळाचे पदार्थ तयार केले जात आहे. बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. सांताक्लॉज विक्रीसाठी दाखल झाला आहे.
-----
सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतूक कोंडी
मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानकाजवळ सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसा या भागात नेहमीच गर्दी असते. ठेकेदाराकडून दिवसा हे काम केले जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्याने हाल होत आहेत.
-----
कॅम्प भागातील स्मशानभूमीची दुरवस्था
मालेगाव : शहरातील श्रीराम नगर स्मशानभूमीसह गवळी समाज, वीरशैव लिंगायत, गोसावी समाज, आदिवासी समाज स्मशानभूमीत काटेरी झाडे, गाजर गवत वाढले आहेत. अंत्यविधीनंतरचे कपडे, फुलहार, बांबू, राख तशीच पडून आहे. कुत्र्यांचा या परिसरात वावर असतो. पथदीपदेखील बंद आहेत. या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी मराठा महासंघाचे भरत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
-----
सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या तुटून पडल्या आहेत. यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शौचालयांची मोडतोड होत आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.