ुबारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 08:21 PM2020-07-16T20:21:31+5:302020-07-17T00:02:57+5:30
नाशिक : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात शाळांचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी अनेक शाळांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
नाशिक : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात शाळांचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी अनेक शाळांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
वैनतेय विद्यालयात सायली श्रीवास्तव प्रथम
निफाड : बारावीत येथील वैनतेय ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. या कॉलेजने यावर्षी यशाची परंपरा कायम ठेवली. सायली रतन श्रीवास्तव ही विद्यार्थिनी ९०.७६ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. परीक्षेसाठी १९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . हे सर्व १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्राविण्य श्रेणीत १५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ९३ विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत ८३ विद्यार्थी , उत्तीर्ण झाले . द्वितीय -ऋ षिकेश सदाफळ (८७.७७ टक्के ), तृतीय- भाग्यश्री वाटपाडे (८६.९२ टक्के ) ,चतुर्थ - मयुरी कापसे ( ८३.६९ टक्के ) पाचवी- गौरी लोखंडे - (८०.६१ टक्के)
श्री महावीर महाविद्यालयाची परंपरा कायम
लासलगाव : फेब्रुवारी/मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इ.१३ वी ) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.यात श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करून कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली.कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे.कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल व प्रथम पाच क्र मांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे
अलंगुण शाळेचा बारावीचा निकाल ९८.३८ टक्के
अलंगुण : एच.एस.सी. परीक्षेचा बोर्डाचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला असून येथील शहीद भगतिसंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.३८ टक्के तर कला शाखेचा निकाल ८६.७६ टक्के लागला आहे. या परीक्षेत सायन्स शाखेतील १२४ पैकी १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेचे ६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात ५९ उत्तीर्ण झाले आहेत. सायन्स शाखेत १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून कला शाखेतील ५५ विद्यार्थ्यांचा प्रथम श्रेणीत समावेश आहे आहे.
एचएएल महाविद्यालयाचा ९९.४० टक्के निकाल
ओझर टाऊनशीप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ३३६ विद्यार्थ्यांपैकी ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून निधी चोरडिया या विद्यार्थिनीने (८१) प्रथम क्र मांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.७५ टक्के लागला. प्रांजल खोडे (९१.०७) ही प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाली असून बुक किपिंग आणि अकौंटसी या विषयात तिने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. बारावीच्या व्होकेशनल विभागातून परीक्षेस बसलेल्या ४७ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाखेचा निकाल ९७.८७ टक्के लागला असून योगेश पवार (७५.८४) याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.