मुक्तानंद विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:28 AM2021-02-21T04:28:22+5:302021-02-21T04:28:22+5:30

नेपाळमधील अत्यंत डोंगराळ भागातील रंगशाळा स्टेडियमवर झालेल्या कराटे स्पर्धेत सहावीतील गुंजन दत्तात्रय चौधरी व तिसरीतील अनुराग दत्तात्रय चौधरी या ...

Success of two students of Muktanand Vidyalaya | मुक्तानंद विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

मुक्तानंद विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

Next

नेपाळमधील अत्यंत डोंगराळ भागातील रंगशाळा स्टेडियमवर झालेल्या कराटे स्पर्धेत सहावीतील गुंजन दत्तात्रय चौधरी व तिसरीतील अनुराग दत्तात्रय चौधरी या बहीण - भावाने अटीतटीच्या रोमांचक लढतीत अनुक्रमे सुवर्णपदक आणि रजतपदक मिळविले.

भारताचे प्रतिनिधित्व करीत कराटे स्पर्धेत विजयश्री खेचून आणत भारताचा तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवणाऱ्या या बहीण-भावाचा गुणगौरव समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सेक्रेटरी दीपक गायकवाड यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ. पहिलवान यांनी स्व. प्र. सा. पहिलवान मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रत्येकी पाचशे रुपये रोख तर सेक्रेटरी गायकवाड यांनीही व्यक्तिगत दोन्ही विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक प्रदान केले. कराटे प्रशिक्षक बोढारे यांचाही यावेळी प्राचार्य ए. जी. नाकील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक - सूत्रसंचालन उत्सव प्रमुख डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुनेत्रा पैंजणे, उपमुख्याध्यापक लता निकम, पर्यवेक्षक धिवर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- २० मुक्तानंद स्कूल

===Photopath===

200221\20nsk_45_20022021_13.jpg

===Caption===

फोटो- २० मुक्तानंद स्कूल 

Web Title: Success of two students of Muktanand Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.