शिष्यवृत्ती परीक्षेत वावीच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:54 PM2020-11-20T21:54:41+5:302020-11-21T00:51:03+5:30
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे.
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. त्यापैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, तन्मय उंबरे व समृद्धी संतोष देसाई यांनी तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून इयत्ता आठवीतील ३९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. अनुष्का वाळुंज, सुदर्शन पठाडे, दिव्या आनप, सूरज कदम, तेजस राहटळ, यश वाजे, श्रेया काळोखे, ओंकार राजेभोसले, तनिष्का मुदळ, शुभम सरवार यांचा पात्र विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. कैलास तडवी, प्रदीप लोहार, सुनील तांबेकर, मनीषा सानप, लीना पावरा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यावर गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. प्राचार्य विश्वास काकळीज, पर्यवेक्षक शरद सालके, शालेय समितीचे अध्यक्ष कन्हय्यालाल भुतडा, सदस्य विठ्ठल राजेभोसले, रामनाथ कर्पे, माजी सरपंच विजय काटे, पालक प्रतिनिधी डॉ.संतोष देसाई यावेळी उपस्थित होते.