मेहनतीला मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:11 AM2018-03-26T00:11:02+5:302018-03-26T00:11:02+5:30
परिस्थितीची जाणीव ठेवून जीद्द व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जनता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी केले. झोडगे परिसरातील तरुण सैन्य दल व प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभाप्रसंगी देसले बोलत होते.
झोडगे : परिस्थितीची जाणीव ठेवून जीद्द व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जनता एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसले यांनी केले. झोडगे परिसरातील तरुण सैन्य दल व प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभाप्रसंगी देसले बोलत होते. सैन्य दलामध्ये झोडगे येथील दिगंबर काळगुडे, हर्षल थोरकर, कुलदीप कापुरे, पृथ्वीराज सोनवणे, तर कंधाणे येथील भूषण गर्दे, समाधान जाधव, भिलकोट येथील गणेश सूर्यवंशी, अभिषेक चव्हाण, गणेश ठाकरे यांची सैन्य दलात निवड झाली आहे. राहुल देसले वनविभागात भाऊसाहेब मगर व भूषण देसले यांची रेल्वे मध्ये निवड झाली. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य बी. ए. पाटील उपमुख्याध्यापक एस. डी. शिदे, एम. एच. देसाई, व्ही. बी. देशमुख, एन.सी.सी आॅफिसर एस. बी. बाविस्कर आदी उपस्थित होते. झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या सव्वीस वर्षांपासुन राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्राचार्य मेजर बी.ए. पाटील यांनी माळमाथा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून महाराष्ट्र ४८ बटालियन चे युनिट सुरू केले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांत झोडगेसह परिसरातील शेकडो तरुण सैन्य दलात भरती झाले आहेत, तर पोलीस, रेल्वे आदीसह विविध ठिकाणी नोकरी करत आहेत. सैन्य दलातील कठीण प्रशिक्षणाची पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. विद्यालयच्या वतीने भरतीपूर्व विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येते. यावेळी संदीप बाविस्कर यांनी आभार मानले.
झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सव्वीस वर्षांपासून राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. प्राचार्य मेजर पाटील यांनी माळमाथा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून महाराष्ट्र ४८ बटालियनचे युनिट सुरू केले आहे. परिसरातील तरुण मोठ्या प्रामाणात सैन्य दलात भरती झाले आहेत.