एनएमएमएस परीक्षेत गुळवंच विद्यालयाची यशस्वी भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:37 PM2019-02-21T17:37:30+5:302019-02-21T17:37:43+5:30
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील ङ्क्त गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे.
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील ङ्क्त गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे.
विद्यालयातील इयत्ता आठवीचे २७ विद्यार्थी राष्टÑीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यातील २ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. त्यात हर्षदा संदीप काकड व प्रशांत भगवान सानप यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे शिक्षक दत्तात्रय रेवगडे यांचे
मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गुळवंच ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, परिवर्तन आणि संशोधन प्रतिष्ठान मुंबई यांचेकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर काळे, वृषाली सानप, चंद्रकांत घरटे, भास्कर रेवगडे, शरद केदार, संजय सानप, छाया सांगळे, सुरेखा जगताप, ललित रत्नाकर, संदीप धूम, नवनाथ सानप, मारूती सानप आदींसह शिक्षक वङ्क्त शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.