यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला सटाणा महाविद्यालयात यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:54 PM2020-01-06T20:54:06+5:302020-01-06T20:54:34+5:30
सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.
सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, बहि:शाल या शब्दाचा अर्थ शाळाबाहेरील शिक्षण असा आहे. विद्यार्थ्यांना शालेय आणि समाजातील अन्य विषयांची माहिती मिळण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन विद्यापीठातर्फे केले जाते असे स्पष्ट केले.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प वसंत सोनवणे यांनी गुंफले. ‘संत गाडगेबाबा जीवन कार्य’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, संत गाडगे बाबांनी समाजात असलेल्या अंधश्रद्धा, रुढी, परंपरा या अज्ञानामुळे पाळल्या जातात. समाजातील अज्ञान दूर होण्यासाठी भजन, किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले.
दुसरे पुष्प डॉ. निवास पाटील यांनी ‘परग्रहावरील सजीवसृष्टी’ या विषयावर गुंफले. त्यांनी सुर्यमालेतील नऊ ग्रहांची माहिती दिली व मंगळ या ग्रहावर सजीवसृष्टी असू शकते. त्या दिशेने संशोधन सुरु आहे. हे स्पष्ट केले. कंकनाकृती सूर्य ग्रहणाची सविस्तर माहिती चित्रफिती द्वारा विद्यार्थ्यांसमोर मांडली.
सदर व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प प्रा. हेमंत टिळे यांनी ‘हुतात्मा अनंत कान्हेरे’ या विषयावर गुंफले. ते म्हणाले की हुतात्मा अनंत कान्हेरे भारतीय स्वातंत्र्य लढयातील सशस्त्र क्र ांतिकारक होते. अभिनव भारत या क्र ांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची गोळया मारु न हत्या करणारे ते क्र ांतिकारक होते.
व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. निलेश पाटील, डॉ. दीपा कुचेकर, प्रा. धनंजय पंडित, प्रा. लक्ष्मण सुर्यवंशी, प्रा. युवराज गातवे, प्रा. वैशाली बागुल, के. एल. आहेर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.