...असा साजरा होतो डोंग-यादेव उत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:42 PM2018-12-14T16:42:28+5:302018-12-14T16:42:41+5:30

सावकीला आनंदोत्सव : आदिवासी बांधवांचे कडक व्रत

 Such festival is celebrated with dong-yadav | ...असा साजरा होतो डोंग-यादेव उत्सव!

...असा साजरा होतो डोंग-यादेव उत्सव!

Next
ठळक मुद्देया उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ति पंधरा दिवस सहभागी होतो. सदर उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर साजरा केला जातो.

खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी येथे डोंग-यादेव उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांकडून हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवामुळे आदिवासी बांधवासह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
आदिवासी बांधवाचे हे अत्यंत कडक व्रत मानले जाते. या उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ति पंधरा दिवस सहभागी होतो. सदर उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी उघड्यावर साजरा केला जातो. या जागेवर बांबू किवा काठी उभे करून कुंपण केले जाते. त्याला एक प्रवेशद्वार असते. त्याला आदिवासी बांधव खळी असे संबोधतात. या खळीच्या मध्यभागी मांडव टाकला जातो. या मांडवात देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदिवासी बांधव लयबद्ध चालीवर नाचतात. यावेळी देवदेवतांचे कथन केले जाते. त्यासाठी थाळी हे वाद्य लावण्यात येते.उत्सवात सहभागी झालेल्या व्यक्तींना भाया म्हणून संबोधले जाते. या लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. दिवसभर परिसरातील गावागावात जाऊन प्रत्येकाच्या घरासमोर डोंग-या देवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचत शिधा म्हणून धान्य मागितले जाते. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आदिवासी बांधव आपल्या खळीवर येतात. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो. देवाचे व्रत करणा-या या सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर असे भोजन दिले जाते. उत्सवाची सांगता मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला होते. या पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी गुहा उघडली जाते. पाच भाया आत मध्ये जाऊन तेथील देवतांचे पूजन करून गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात. त्या नंतर प्रसादाचा कार्यक्र म ठेवला जातो.

Web Title:  Such festival is celebrated with dong-yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक