टेक्नोसॅव्ही तरुणाईची अशीही रुग्णसेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:24+5:302021-05-13T04:14:24+5:30

नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक बाब कुठेही स्वत:च जाऊन करण्याची सवय असल्याने मोबाईलवरून उपलब्ध होऊ शकणारी माहितीही त्यांच्याकडे उपलब्ध ...

Such patient care of technosavvy youth! | टेक्नोसॅव्ही तरुणाईची अशीही रुग्णसेवा !

टेक्नोसॅव्ही तरुणाईची अशीही रुग्णसेवा !

Next

नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक बाब कुठेही स्वत:च जाऊन करण्याची सवय असल्याने मोबाईलवरून उपलब्ध होऊ शकणारी माहितीही त्यांच्याकडे उपलब्ध नसते. किंबहुना ती मदत कशी मिळवायची तेदेखील ज्ञात नसल्याने पन्नाशीवरील अनेक नागरिकांची खूपच कुचंबणा होते. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे घरीच रहावे लागत असलेल्या तरुणाईकडून त्यांच्या टेक्नोसॅव्ही असण्याचा लाभ या ज्येष्ठांना करून दिला जात आहे. त्यासाठी काही व्हॉट्‌सॲप ग्रुप कार्यरत झाले आहेत, तर काही तरुणांच्या ग्रुपनी ऑक्सिजन, प्लाझ्मा, बेडची उपलब्धता याबाबतची माहिती तंत्रज्ञानांद्वारे उपलब्ध करून ती संबंधित गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अनेक घरांमध्ये केवळ साठीवरील ज्येष्ठ नागरिक असतात. त्यात त्यांच्याकडील कुणी बाधित झाल्यास ॲडमिट कुठे करायचे, ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध होईल, गरज भासल्यास ऑक्सिजन सिलिंडर कुठून मिळू शकेल, प्लाझ्मा कोणत्या ब्लड बँकेत मिळेल, अशा सर्व बाबींची माहिती मोबाईलचा उपयोग करून काही युवकांचे ग्रुप गोळा करून ती गरजू नागरिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करून देतात. जिल्ह्यातील विविध व्हॉट्सॲप ग्रुपसमवेतच शहरातील कोविड सेंटर्ससमवेत काम करणाऱ्या तरुणाईपैकी काही जण तर शहरातील कोविड सेंटरनाच संलग्न राहून तिथे येणाऱ्या गरजूंना ते अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

इन्फो..

सीटू भवनला तब्बल १७० स्वयंसेवक

ज्या नागरिकांना रुग्णाशी निगडित कोणतीही माहिती, सेवा, सुविधा हवी असेल तर ती या टेक्नोसॅव्ही तरुणांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या सीटू भवनच्या विलगीकरण कक्षाकडे १७० स्वयंसेवकांची फौज उपलब्ध आहे. पाच गटांमध्ये हे स्वयंसेवक कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकांना ही सेवा उपलब्ध होऊ शकत आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकत आहे.

Web Title: Such patient care of technosavvy youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.