उद्योगात यशस्वीतेसाठी पैशापेक्षा जिद्दच महत्वाची: सुरेश हावरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:46 PM2018-09-01T18:46:18+5:302018-09-01T18:48:27+5:30

अपयशी व्यक्तींना जगात कोणीही ओळखत नाही. परंतु यशस्वी व्यक्तींना इतिहासही लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही नव उद्योजतांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी, उद्योगात यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षाही जिद्दच म्हत्वाची असल्याचे असे प्रतिपादन शिडी संस्थानचे अध्यक्ष तथा ख्यातनाम बांधाकाम व्यावयासिक सुरेश हावरे यांनी केले आहे. 

Suchet Havre is important for the success of the industry | उद्योगात यशस्वीतेसाठी पैशापेक्षा जिद्दच महत्वाची: सुरेश हावरे 

उद्योगात यशस्वीतेसाठी पैशापेक्षा जिद्दच महत्वाची: सुरेश हावरे 

Next
ठळक मुद्देउद्योजकतेसाठी पैशापेक्षा जिद्द आवश्यक सुरेश हावरे यांचे उद्योग कुंभ परिषदेत प्रतिपादन

नाशिक : या जगात अपयशी व्यक्तींना कोणीही ओळखत नाही. परंतु यशस्वी व्यक्तींना इतिहासही लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही नव उद्योजतांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी, उद्योगात यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षाही जिद्दच म्हत्वाची असल्याचे असे प्रतिपादन शिडी संस्थानचे अध्यक्ष तथा ख्यातनाम बांधाकाम व्यावयासिक सुरेश हावरे यांनी केले आहे. 
सॅटर्डे क्लबच्या नाशिक येथील राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ परिषदेत शनिवारी (दि.१) उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. व्यासपीठावर सदरच्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोलेतथा, अ‍ॅड. नितीन पोद्दार, सौंदर्य रेखा चौधरी तज्ज्ञ , कॅप्टन अमोल यादव, भावेश भाटीया, अभिनेता संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.परिषदेच्या सुरुवातीला अ‍ॅड. नितीन पोद्दार यांनी व्यवसाय करतांना होणाऱ्या चुकांची बोलकी सांगितली. सुरेश हावरे म्हणाले, उद्योग सुरू करण्यासाठी भाषा, शहरी ग्रामीण, जात धर्म या गोष्टींना कोणतीही किंमत नसून व्यक्तीमध्ये उद्योग सुरू करण्याची धमक आणि यशस्वी होण्याची जिद्द असावी लागते. अनेकांना पैशाअभावी उद्योग सुरु करता येत नाही. परंतु उद्योग हा स्वत:च्या पैशावर नव्हे, तर दुसºयाच्या पैशावर करायचा असतो,त्यासाठी भांडवल पुरवठा करणाऱ्या बँक ा, शेअर मार्केट, गुंतवणूकदारांसह वेगवेगळ््या मार्गाने पैसा उपलब्ध करणे शक्य आहे. परंतु, गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा वाढविण्याचा विश्वास करून देण्याची गरज असून उद्योजकांनी प्रामाणिकपणे आणि विश्वासार्हतेने उद्योग करण्याचा सल्ला त्यांनी दिला.  देतानाच विविध संशोधक आणि उद्योजकांनीची उदाहरणे देताना त्यांनी ज्यांनी यश संपादन केले. त्यांनाच जगाने लक्षात ठेवले, परंतु ज्यांना प्रयत्न करूनही अपयश आले ते विस्मरणात गेल्याचे सांगतानाच उद्योगात यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी असा कानमंत्र सुरेश हावरे यांनी दिला. या परिषदेत उद्योगाच्या नवीन संधी, अंतर्गत उद्योग व्यवसाय विकास, व्यवसाय निर्मितीमधील समस्यांवर तोडगा, उद्योग व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, व्यवसायातील भांडवल उभारणी, कायदेशीर सल्ला आदी विषयांवर उपस्थित तज्ज्ञ व यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात पियुष सोमाणी, सुधीर मुतालिक , श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी मार्ग दर्शन केले.दुपारच्या सत्रात अच्युत गोडबोले यांनी आगामी दिवस हे जुगाड तंत्रज्ञानाचे असून उद्योजकांनी नवनवीन कल्पानांच्या आधारे उत्पादन घेण्याचे आवाहन केले.   

Web Title: Suchet Havre is important for the success of the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.