सुदर्शन जाधव यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:18 AM2018-02-27T00:18:09+5:302018-02-27T00:18:09+5:30
भारत सरकारच्या यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या (आयएफएस) परीक्षेत देशात ४७ वी रँक मिळवून यश संपादन केलेल्या सांगवी ( ता. देवळा ) येथील सुदर्शन जाधव यांचा उमराणे येथील ग्रामस्थ व जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
उमराणे : भारत सरकारच्या यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या (आयएफएस) परीक्षेत देशात ४७ वी रँक मिळवून यश संपादन केलेल्या सांगवी ( ता. देवळा ) येथील सुदर्शन जाधव यांचा उमराणे येथील ग्रामस्थ व जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. उमराणे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच रामदास देवरे, बँक निरीक्षक सुदाम देवरे, मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांच्या हस्ते शिवकालीन पगडी परिधान करून जाधव यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव, नानाजी सोनजे, सीताराम सोनजे, खंडू सोनजे, पंढरीनाथ जाधव, गोपीनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ज्योती सोनजे, स्वाती जाधव, भारती पानसरे, सविता हिरे, नंदन देवरे, रामदास देवरे, राजेंद्र देवरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी किरण सोनार, संदीप हिरे, उमेश देवरे उपस्थित होते. प्राथमिक शिक्षकाच्या कुटुंबात जन्मलेल्या सुदर्शनच्या शिक्षणाचा प्रवास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सुरू झाला. उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने जाधव यांची वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.