बागलाणच्या जवानाचा अकस्मित मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 06:41 PM2020-11-22T18:41:28+5:302020-11-22T18:43:51+5:30
सटाणा : पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची खुशखबर मित्रांना सांगून घराकडे निघालेल्या लष्करातील जवान व पिंगळवाडी येथील वीरपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव झोपेतच आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती मेजर गौरव यांनी रविवारी (दि.२२) दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सटाणा : पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची खुशखबर मित्रांना सांगून घराकडे निघालेल्या लष्करातील जवान व पिंगळवाडी येथील वीरपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव झोपेतच आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती मेजर गौरव यांनी रविवारी (दि.२२) दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
येथील प्राथमिक शिक्षक नंदकिशोर जाधव यांचा कुलदीप (२५) थोरला मुलगा लहानपणापासून लष्करात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असल्यामुळे अवघ्या साडे सतरा वर्षाचा असतानाच कुलदीप मराठा बटालियन मध्ये भरती झाला. त्याने नुकतीच आठ वर्ष सेवपूर्ण केली होती. सध्या सीमेवर तणाव असल्यामुळे लडाख नजीक कुलदीप तैनात होता. त्याला दिवाळीच्या दिवशीच पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे मुलाच्या भेटीसाठी त्याने दोन दिवसापूर्वीच रजा टाकली होती.
घराकडे निघालेला कुलदिप गेल्या शुक्रवारी (दि.२०) रात्री कारगिल सेक्टरमध्ये मुक्कामाला होता. सुट्टीवर निघालेल्या सर्व जवानांना सकाळी मेजर गौरव यांनी रोलकॉल केला, मात्र कुलदीप आला नसल्याने त्यांची चौकशी केली असता तो झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. मेजर गौरव यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात भरती केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच झोपेतच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेने बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
कुलदीपवर मंगळवारी अंत्यसंस्कार ......
शहीद कुलदीपचे पार्थिव सोमवारी (दि.२३) श्रीनगरहून एका विशेष विमानाने मुंबईला आणण्यात येणार आहे. रात्री बारा वाजेच्या दरम्यान लष्कराकडून शहीद कुलदीपला मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पिंगळवाडे येथे त्यांच्या राहत्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून गावातच लष्करी इतमामात कुलदीपवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
ह्यकुलदीपकह्णची भेट अधुरीच ...
कमी वयात लष्करात भरती झालेल्या कुलदीपचे गेल्या १५ नोव्हेंबर २०१७ मध्ये किकवारी येथील नीलमशी विवाह झाला. विवाहा नंतर तीन वर्षांनी कुलदीपला आपल्या कुटुंबाचा ह्णकुलदीपकह्ण प्राप्त झाला. लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्याच दिवशी कुटुंबात बाळाचे आगमन झाल्यामुळे जाधव कुटुंबाची दिवाळी अधिकच उजळून निघाली. पुत्ररत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी कुलदीपलाही दिली. बाप झाल्याची खुशखबर मित्रांना सांगितली आणि लवकरच मी बाळाच्या भेटीला येईल म्हणून त्याने कुटुंबियांना कळविले. कारगिल सेक्टरमध्ये आपल्या ह्यकुलदीपकह्णभेटण्याचे स्वप्न पाहत कुलदीप झोपी गेला मात्र तो कायमचाच, त्यामुळे मात्र आपल्या ह्यकुलदीपकह्णची भेट अधुरीच राहिली.
प्रशासन अनभिज्ञच ....
शहीद कुलदीपच्या मृत्यूबाबत शनिवारी रात्री सोशल मिडीयावर बातमी झळकत होती. याबाबत प्रशासनाकडे याबाबतची खात्री केली असता कोणालाही स्पष्ट अशी माहिती नव्हती. रविवारी दुपारपर्यंत प्रशासनाकडे कोणताही संदेश आलेला नव्हता मात्र स्थानिक माध्यमांनी थेट मेजर गौरव यांच्याशी संपर्क साधल्याने कुलदीपच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती मिळाली.