नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलची अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 03:36 PM2020-07-17T15:36:01+5:302020-07-17T15:40:42+5:30
खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील ३५ रु ग्णालयांना महापालिकेच्या १६ पथकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील उपलब्ध बेड्स तसेच उपलब्ध व्हेंटिलेटर्सबाबत माहिती घेतली. शहरातील खासगी रु ग्णालयात नाशिक जिल्ह्याच्या अन्य भागातील विशेषत्वे उत्तर महाराष्ट्रातील रु ग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे आढळून आले आहे. तसेच व्हेंटिलेटर्सची संख्यादेखील अपुरी असल्याचे या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. विशेषत्वे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणि अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या रु ग्णांसाठी घोटी येथील एसएनबीटी रु ग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे विविध रु ग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी आल्यानंतर गुरु वारी दुपारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पथके नियुक्त करण्याचे आदेश दिले. सायंकाळी सोळा पथके तयार करण्यात आल्यानंतर रात्री ९ वाजेपासून मध्यरात्रीनंतर अडीच-तीन वाजेपर्यंत विविध रुग्णालयांना भेटी दिल्या.