खर्डे आरोग्य केंद्रास सभापतींची अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:35 PM2018-09-27T18:35:36+5:302018-09-27T18:35:59+5:30
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे यांनी आज रात्री आठ वाजता भेट दिली असता दवाखान्यात शिपाई वगळता एकही अधिकारी व कर्मचारी आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
खर्डे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे यांनी आज रात्री आठ वाजता भेट दिली असता दवाखान्यात शिपाई वगळता एकही अधिकारी व कर्मचारी आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
देवळा तालुक्यातील सर्वात मोठे खर्डे येथे प्राथमिक आरोग्य असून,या आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र आहेत. सध्या खर्डे परिसरात विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, खाजगी दवाखान्यात या रूग्णांची गर्दी आढळून येते आहे. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्थित उपचार होत नसल्याची तक्र ार वाढत चालल्याने नागरिकांनी या आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .याची तक्र ार आहिरे यांच्याकडे केल्याने वैद्यकीय अधिकारी सह इतर कर्मचारी जागेवर आढळून न आल्याने तीव्र संताप व्यक्त केला .