निफाड प्रांताधिकाऱ्यांची ओझरला अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:48 PM2020-04-11T13:48:31+5:302020-04-11T13:49:03+5:30
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्र वारी सायंकाळी ओझर येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी शुक्र वारी सायंकाळी ओझर येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे शुक्र वारी येथील संभाजी चौकात भरविण्यात आलेल्या बाजाराचे कमी जागेमुळे काही ठिकाणी सोशल डिस्टनिसंगचे पालन झाले नाही.त्यामुळे पुढच्या वेळेस आखून दिलेल्या जागेपेक्षा जास्त विक्र ेते आलेच तर त्यांना काही वेळासाठी विश्वसत्य शाळेचे ग्राउंड उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बाजार तळा बाबत झालेला निर्णय कायम ठेवावा असे त्यांनी सूचना केल्या. गर्दी टाळण्यासाठी किराणा पेठेत सम विषम पद्धतीने व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची केलेली अंमलबजावणी बाबत त्यांनी आढावा घेतला.यात्रा मैदान येथे गर्दी करून उभ्या असलेल्यांवर त्यांनी कारवाहीचे आदेश दिले.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर,उपनिरीक्षक अजय कवडे आदींसह ग्रामपंचायत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
पुढील आठवड्यात १४ एप्रिलला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने माजी सरपंच हेमंत जाधव , दीपक श्रीखंडे, धर्मेंद्र जाधव,प्रवीण जाधव,स्वप्नील केदारे,किशोर त्रिभुवन यांनी पठारे यांची भेट घेत कोणीही कायद्याचे उल्लंघन करणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरातच प्रतिमा पूजन करणार असल्याचे उत्सव समितीतर्फे सांगण्यात आले.