बहिणीला सासरी घेऊन जाणाºया भावावर काळाची झडप : बहीण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:04 PM2017-09-14T22:04:53+5:302017-09-14T22:10:52+5:30
पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली.
सिडको : : पाथर्डी-वडनेर रस्त्यावरून पाथर्डी फाट्याकडे दुचाकीने बहिणीसोबत जात असताना समोरून भरधाव पाथर्डी गावाकडे जाणाºया ट्रकचालकाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि.१४) दुपारी घडली. या अपघातात दुचाकीस्वार सागर बंडू कासार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण गंभीररीत्या जखमी झाली आहे.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मूळ देवळाली कॅम्पजवळील शेवगेदारणा गावाचा रहिवासी असलेला सागर हा त्याची बहीण योगीता विकास शिंदे हिला सातपूर गावात सासरी सोडण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १५ एफएल ८५२०) जात होता. पाथर्डी फाट्याजवळ आला असता समोरून येणाºया ट्रकच्या (एमएच १२ एएफ ८४९६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वेग नियंत्रणात न ठेवता सागरच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी गंभीर होती की हे दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला, तर योगीता गंभीर जखमी झाली असून, तिला येथील खासगी रुग्णालयात नागरिकांनी उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रकचालक रामदास नारायण सांगळे (दोडी, ता.सिन्नर) यास ताब्यात घेतले आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.