वृक्ष तोड करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:18 PM2020-03-03T19:18:28+5:302020-03-03T19:21:31+5:30
नाशिक- महापालिकेच्या वतीने धोकादायक वृक्ष तोड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराने लाकुड फाट्याबद्दल नऊ लाख रूपये प्रशासनाला न देता फसवणूक केल्याचे आज वृक्ष प्राधीकरण समितीच्या बैठकीत निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधीत ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

वृक्ष प्राधीकरण समितीची बैठक आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने शहरातील धोकादायक झाडे तोडण्यासाठी तसेच घेर कमी करण्याच्या कामासाठी ठेका दिला होता. झाडे तोडल्यानंतर प्रति किलो लाकुड फाटा देण्याच्या देकारावर त्याची नियुक्ती करण्यात आली होती. ठेकेदाराने झाडे तोडली मात्र तीन दिवसात त्याचा हिशेब देणे बंधनकारक असतानाही तो दिला नाही. यासंदर्भात समितीच्या गेल्याच बैठकीत वादळी चर्चा झाली होती. सदरच्या ठेकेदाराला नोटिस बजावण्यात आल्यानंतर त्याने तीन दिवसात सर्व माहिती आणि तपशील मागवण्यात आली. परंतु त्यानंतर देखील ठेकेदाराने माहिती दिली नाही. त्यामुळे आता नऊ लाख रूपयांची रक्कम ठेकेदाराने दिली नाही आणि त्याचा हिशेबही दिला नसल्याने कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. कृष्णा एन्टरप्रायझेस असे ठेकेदार फर्मचे नाव आहे.
दरम्यान, पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये क्रिडांगण आणि सिडकोत सेंट्रल पार्कसाठी झाडे तोडण्याचे प्रस्ताव होते. त्यातील शक्य तेवढी झाडे वाचवून अगदीच नाईलाज असेल तेवढी झाडे तोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.