वसाका सभासद हक्कप्रकरणी साखर आयुक्त घेणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 12:31 AM2022-03-01T00:31:22+5:302022-03-01T00:33:11+5:30
कळवण : कळवणसह देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सभासद हक्क संपुष्टात आणून केलेल्या अवसायक नियुक्तीस सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे घेण्यात आलेल्या आक्षेप याचिकेची सुनावणी साखर आयुक्त पुणे यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त पुणे यांनी दिले आहेत.

वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी याबाबत सहकार आयुक्त पुणे अनिल काकडे यांची भेट घेऊन याप्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची संपूर्ण मालमत्ता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने जप्त केली असून, कारखाना परस्पर धाराशिव साखर उद्योग उस्मानाबाद यांना प्रदीर्घ काळासाठी वार्षिक भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेला आहे. कारखाना बँकेची अंतिम मालमत्ता नाही. सहकार विभागाने कारखान्यावर अवसायक नियुक्त केला असून, या नियुक्तीस देवरे यांचा आक्षेप आहे. सभासद हक्क पुनर्स्थापित करावा, या प्रमुख मागणीसाठी याचिका सादर केली असल्याची माहिती सुनील देवरे यांनी दिली.
जप्त मालमत्ता मुक्त करावी..
राज्य सहकारी बँकेने कारखाना मालमत्ता जप्त करून तत्कालीन शासन नियुक्त प्राधिकृत मंडळाने सभासदांचा विश्वासघात करून परस्पर कारखाना भाडेतत्त्वावर दिलेला आहे. भाडे रक्कम कर्ज खात्यात वर्ग होत असताना राज्य सहकारी बँकेने जप्त मालमत्ता आता मुक्त करावी, अशी आपली मागणी असल्याचे सुनील देवरे यांनी म्हटले आहे.