शंभर शेतकऱ्यांकडून दीडशे एकरवर ऊसशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:57+5:302021-03-05T04:14:57+5:30
बागलाणच्या सीमेलगत असलेल्या पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथील बागायती क्षेत्रात द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सहयोगाने येथील ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी ...
बागलाणच्या सीमेलगत असलेल्या पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथील बागायती क्षेत्रात द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सहयोगाने येथील ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेतीचा प्रयोग सुरू केला आहे.
ऊस विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रयोग राबविण्यात आला आहे. ऊस तोडणीस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. द्वारकाधीशच्या सामूहिक ऊस शेतीचा यशस्वी प्रयोग
कारखाना ऊस विकास कार्यक्रमासाठी बागलाण, साक्री, नवापूर व कळवण तालुक्यांमध्ये गेली २१ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने राबवीत आहे. कारखान्याचे विविध ऊस विकास योजनेंतर्गत सामूहिक ऊस शेती पथदर्शक प्रकल्प गाव-पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे पंच कमिटीचे अध्यक्ष सुदाम पगारे व लाभार्थ्यांचे सहकार्याने यशस्वी झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी योजनेतील ऊसतोड कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, संचालक कैलास सावंत, शेतकी अधिकारी विजय पगार, ऊस विकास अधिकारी वसंतराव माळी, नितीन कापडणीस, ऊस विकासचे विजयराव गांगुर्डे, गोरख चौरे, पाठ बागायत शेतकरी सुदाम पगारे, प्रशांत पाटील, डॉ. दिलीप राजपूत, एस.ए. पाटील, संभाजी पगारे, विलास घरटे आदी उपस्थित होते.
इन्फो
साखर उतारा १२.७४ टक्के
प्रमाणित ऊस बेण्यापासून पीक संगोपनासाठी संपूर्ण मालरूप खर्च विनाव्याजी राबवीत आहे. त्यासाठी नामांकित संशोधन संस्थेचा सल्ला, तज्ज्ञ अधिकारी यांचे मार्गदर्शनाने ऊस उत्पादन एकरी ३०-३५ मे. टनावरून ६० ते ८० मे. टनापर्यंत तर साखर उतारा १०.३३ टक्क्यांवरून ११.५७ टक्क्यांंपर्यंत मिळत आहे. या हंगामातील आजचा साखर उतारा १२.७४ टक्के आहे. गळीत हंगाम अद्याप चालू आहे.
फोटो- ०४ सटाणा शुगरकेन
पिंपळनेर येथे द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सामूहिक ऊस गट शेती प्रयोगातील ऊस तोडण्याचा शुभारंभ करताना मुकादम परशुराम राठोड. समवेत अध्यक्ष शंकराव सावंत, संचालक कैलास सावंत यांच्यासह उपस्थित शेतकरी बांधव.
===Photopath===
040321\04nsk_40_04032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ सटाणा शुगरकेनपिंपळनेर येथे द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सामुहिक ऊस गट शेती प्रयोगातील ऊस तोडण्याचा शुभारंभ करतांना मुकादम परशुराम राठोड. समवेत अध्यक्ष शंकराव सावंत, संचालक कैलास सावंत यांचेसह उपस्थित शेतकरी बांधव.