जनावरांच्या चार्यासाठी ऊसाला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:27 PM2020-06-14T18:27:41+5:302020-06-14T18:28:02+5:30
रसवंतीगृह बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना स्वतःच्या वाहनात ऊस भरून ऊस घेता का ऊस अशी विनवणी करत फिरायची वेळ आली आहे.
नाशिक : हिरवा मका उपलब्ध होत नसल्याने व सर्वत्र चार्याची टंचाई असल्याने जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांकडून उसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्याच्या हंगामा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे सर्वच पिके जोमदार आली. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी चाटोरी, हिवरगाव, करंजगाव, म्हाळसाकोरे, सोनगाव या गावांमध्ये शेतकरी उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. परिपक्व झालेला ऊस शेतकरी व्यापार्यांना अथवा स्वतःच्या वाहनाने रसवंती अथवा ऊस लागवडीसाठी किंवा जनावरांच्या चार्यासाठी विक्री करतात. यावर्षी मार्च ते मे हे तीन महिने लॉकडाऊन असल्याने रसवंती पूर्णपणे बंद होत्या. तसेच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उरकला होता. त्यामुळे उसाला मागणी घटली. रसवंतीगृह बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना स्वतःच्या वाहनात ऊस भरून ऊस घेता का ऊस अशी विनवणी करत फिरायची वेळ आली आहे. सध्या हे शेतकरी पंचाळे, देवपूर, मिठसागरे या गावांमध्ये करत आहे. तसेच काही शेतकरी हे व्यापार्यांना व वाहनचालकांना बाराशे ते चौदाशे रुपये प्रतिटन घाऊक भावाने ऊस होलसेल भावाने विक्री करतात. तोच ऊस व्यापारी, वाहनचालक हे तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर जाऊन 2400 रुपये प्रतिटन या भावाने विक्री करत आहेत. त्यामध्ये उसाच्या बाड्यांचे (वाड्यांचे) वजन वजा केले जात नाही. जनावरांना सध्या हिरवा मका चार्यासाठी उपलब्ध नसल्याने तसेच चार्याची टंचाई असल्याने उसाला शेतकर्यांकडून मोठी मागणी होत आहे. एक टन चारा 5 जनावरांसाठी पाच दिवसच पुरतो. मात्र पर्याय नसल्याने शेतकर्यांना जनावरांच्या चार्यासाठी महागड्या भावाने ऊस खरेदी करण्याची वेळ आली आहे