दलितवस्ती कामांचा दर्जा राखण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:31 PM2018-09-07T23:31:18+5:302018-09-08T00:56:59+5:30
दलितवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.
नाशिक : दलितवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी दलितवस्ती कामाचा आढावा घेताना दर्जायुक्त कामे करण्याची अपेक्ष चारोस्कर यांनी व्यक्त केली. दलितवस्तीची कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी असतात ही कामे चांगल्या दर्जाची व्हावी, कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांनी कामांवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दलितवस्ती कामांचे प्रस्ताव २५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तर यानंतर आलेले प्रस्तावच स्वीकारले जाणार नसल्याचे चारोस्कर यांनी जाहीर केले.
याप्रसंगी प्रभारी समाज कल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व योजना राबविण्याबाबत संबधिंतांना सूचना केल्या. सभेस वनविभागाचा आढावा सोनाली जाधव यांनी मांडला. यावेळी त्यांनी वनविभागाच्या योजनांची माहितीही दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, कन्हू गायाकवाड, वनिता शिंदे आदी उपस्थित होते.
हायस्मास्टच्या देखभाल दुरुस्तीच्या सूचना
सन २०१३-१४ ते २०१७-१८ या वर्षात २९२ हायस्मास्टची कामे करण्यात आलेली होती त्यापैकी बंद असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येऊन बंद हायमास्टची देखभाल दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीने करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या. वनअनुदानाबाबत सन २०१७-१८ मध्ये १.६५ लक्ष इतका अल्पनिधी असल्याने कोणते काम घ्यावे याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. जादा निधी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.