पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:26 AM2019-07-14T00:26:36+5:302019-07-14T00:32:47+5:30

कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत पाथर्र्डी फाटा येथील जलकुंभाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Suggestions for streamlining of water supply | पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देपाथर्डी फाटा ; जलकुंभाची पाहणी

इंदिरानगर : परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत पाथर्र्डी फाटा येथील जलकुंभाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सुमारे एक महिन्यापासून पाथर्डी ते नासर्डी परिसरात दरम्यान मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला तेव्हापासून आणि महापालिकेने पाणीकपातीचा व गुरु वार कोरडा दिवस तेव्हापासून राजीवनगर, पाटील गार्डन महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवेंद्र सोसायटी, मानस कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर, आधीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याची दखल घेत शुक्रवार (दि.१२) रोजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभाची पाहणी केली व सांगितले की, अधिकारी व कर्मचारीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजनाअभावी कृत्रिम आणि त्यांचे निर्माण झाली आहे. तसेच लोकवस्ती वाढली त्या ठिकाणी अद्यापही कमी व्यासाच्या पाइपलाइन असून, त्या ठिकाणी ज्यादा व्यासाची पाइपलाइन टाकणे तसेच जीर्ण झालेली पाइपलाइन बदलणे, पाण्याची गळती थांबविणे आणि परिसरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. या पाहणी दौºयात व बैठकीत कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर, उपअभियंता भावसार, खाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Suggestions for streamlining of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.