सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:28 AM2018-07-16T00:28:27+5:302018-07-16T00:28:44+5:30
सिडको : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगरमध्ये रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास घडली़ आरती संतोष शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़
सिडको : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगरमध्ये रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास घडली़ आरती संतोष शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ पंडितनगर येथील विवाहिता आरती हिचा सुमारे सात वर्षांपूर्वी संतोष शिंदेसोबत विवाह झाला होता़
विवाहास सात वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने पती संतोष, सासू मंगला शिंदे व मीरा शिंदे हे आरतीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते़ सततच्या छळास कंटाळलेल्या आरतीने रविवारी दुपारी घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत अंबड पोलिसांनी याबाबत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़
आरतीचे काका साहेबराव रोकडे यांनी सासरच्यांच्या छळास कंटाळूनच आरतीने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या घटनेनंतर आरतीचा पती संतोष हा फरार असल्याची माहिती पोलीस हवालदार धरम यांनी दिली आहे़