धरणातच आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:16 AM2017-09-08T01:16:37+5:302017-09-08T01:16:51+5:30
हरणबारी धरणाचे आवर्तन मोसम नदीद्वारे दहिकुटे धरणात सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. गुरुवारी थेट धरणातच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवर्तनाबाबत शुक्रवारी (दि. ८) बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगाव : हरणबारी धरणाचे आवर्तन मोसम नदीद्वारे दहिकुटे धरणात सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. गुरुवारी थेट धरणातच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवर्तनाबाबत शुक्रवारी (दि. ८) बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हरणबारीचे आवर्तन दहिकुटे धरणात सोडावे, यासाठी दहिकुटे धरण संघर्ष समिती व शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी थेट धरणातच ठिय्या आंदोलन केले. तसेच संतप्त शेतकºयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. आंदोलकांनी पाटबंधारे विभाग व स्थानिक प्रशासनाच्या पुतळ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात दहन करीत रोष व्यक्त केला. यावेळी नायब तहसीलदार जगदीश निकम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. हरणबारीच्या आवर्तनासंदर्भात शुक्रवारी (दि. ८) अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पाटबंधारे विभाग व दहिकुटे धरण संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात दहिकुटे धरण संघर्ष समितीचे अनिल पाटील, पिंटू सूर्यवंशी, दिलीप चिकणे, शिवाजी पाटील, अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, गणेश खैरनार, मुन्ना इंगळे, तानाजी देवरे, मच्छिंद्र सूर्यवंशी, विलास घुडे आदिंसह शेकडो शेतकरी, महिला सहभागी झाले होते.