तहसीलदार नियुक्तीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:55 AM2018-07-05T00:55:52+5:302018-07-05T01:00:57+5:30

सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दिशाभूल केली जात असल्याने आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने बुधवारी (दि. ४) तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मनसे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले असता पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी तातडीने आग विझविल्याने अनर्थ टळला.

Suicide attempt for Tahsildar appointment | तहसीलदार नियुक्तीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

तहसीलदार नियुक्तीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देबागलाण : मनसे शहरप्रमुखाने डिझेल ओतून घेतले पेटवून; पोलिसांची धावपळ

सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दिशाभूल केली जात असल्याने
आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने बुधवारी (दि. ४) तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मनसे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले असता पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी तातडीने आग विझविल्याने अनर्थ टळला.
बागलाणला पूर्ण वेळ तहसीलदारांची नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. वेळोवेळी निवेदने देऊन तसेच तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न करूनही आश्वासनांपलीकडे काहीही होत नसल्याने अखेर मनसे पदाधिकाºयांनी या मागणीसाठी डिझेल भरलेले डबे हातात घेऊन तहसील कार्यालयाजवळ आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.
प्रत्येक मनसे पदाधिकाºयाने स्वतंत्रपणे आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनदेखील तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्याला दिले होते. त्यानुसार, बुधवारी ठरल्याप्रमाणे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश नंदाळे, उपशहर अध्यक्ष हेमंत इंगळे, उपतालुकाध्यक्ष विश्वास खैरनार व अन्य आठ-दहा कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास डिझेल सोबत आणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी तर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. परंतु, पोलिसांनी लगेच झडप घालत आग विझविल्याने अनर्थ टळला.‘ाश्वासनांवर आश्वासनेमनसे पदाधिकाºयांनी सुरु वातीच्या काळात बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांच्या मागणीची दखल न घेतली गेल्याने त्यांनी तहसील कार्यालयाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदेखील लवकरच वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनालादेखील चार महिने उलटले असून, अद्यापपर्यंत पूर्णवेळ तहसीलदार न मिळाल्याने मनसे पदाधिकाºयांनी अखेर आत्मदहनाचा मार्ग निवडला. बागलाणला गेल्या आठ महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे रखडली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी दाखलेदेखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत. वेळोवेळी निवेदने देऊन तहसीलला कुलूप लावण्याचा प्रयत्नही झाला होता.

Web Title: Suicide attempt for Tahsildar appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे