आत्महत्त्याचा प्रयत्न: पाण्यात बुडणाऱ्या इसमाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:29 PM2018-07-05T18:29:24+5:302018-07-05T18:34:46+5:30

पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला

Suicide attempts: the basis for the drowning in water | आत्महत्त्याचा प्रयत्न: पाण्यात बुडणाऱ्या इसमाला आधार

आत्महत्त्याचा प्रयत्न: पाण्यात बुडणाऱ्या इसमाला आधार

Next
ठळक मुद्देदीपात्रात उतरलेल्या नागरिकांनी त्यांना अग्नीशामक दलाची मदत पोहचेपर्यंत धरुन ठेवले.बंबावरील रबरी बोट पाण्यात उतरविली

नाशिक : सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेजवळील पूलावरुन एका इसमाने गोदापात्रात गुरूवारी (दि.५) सकाळी उडी घेत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाला घटना कळविली व काहींनी गोदापात्रात सूर फेकत पाण्यात बुडणाऱ्या इसमाला आधार दिला.


याबबात पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र शिंदे यांनी त्यांना प्रतिकार करत नदीपात्रात स्वत:ला पुन्हा झोकून देण्याचा प्रयत्न केला. ते पाण्यातून बाहेर येण्यास तयार नव्हते. त्यामुळे नदीपात्रात उतरलेल्या नागरिकांनी त्यांना अग्नीशामक दलाची मदत पोहचेपर्यंत धरुन ठेवले. यावेळी शिंदे हे त्यांच्या हातातून निसटण्याचाही प्रयत्न करत होते. काही मिनिटांतच अग्निशामक दलाच्या बंबासह जवानांना वाहनचालक बाळासाहेब काकडे यांनी घटनास्थळी पोहचविले. तत्काळ फायरमन रमाकांत खारे, धिरुदत्त पाटील, नितीन म्हस्के आदिंनी बंबावरील रबरी बोट पाण्यात उतरविली आणि नदीपात्रातील शिंदे व नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना बोटीत घेऊन सुरक्षितरित्या नदीकाठावर आणले. तोपर्यंत सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकही घटनास्थळी पोहचले होते.

Web Title: Suicide attempts: the basis for the drowning in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.