धामणगाव आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:30 PM2019-03-19T12:30:57+5:302019-03-19T12:31:13+5:30
शेनित : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेतील शरद भाऊ उघडे (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास शाळेजवळील पिंपळाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली.
शेनित : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेतील शरद भाऊ उघडे (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास शाळेजवळील पिंपळाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली. तालुक्यातील धामणगाव येथे माध्यमिक आश्रमशाळा असून येथे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून येथे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या दहावीचे पेपर चालू असून त्यातीलच एक विद्यार्थी खडकेद येथील रहिवाशी शरद भाऊ उघडे हा याच आश्रम शाळेत गेल्या तीन वर्गापासून शिक्षण घेत होता. सध्या त्याचे दहावीचे पेपर सुरू होते. दोन पेपर शिल्लक होते. काल रात्रीच्या सुमारास येथील शाळेतल्या प्रांगणातील पिंपळाच्या झाडाला रात्रीच्या सुमारास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब शाळेतील मुली जेव्हा सकाळच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी आल्या तेव्हा लक्षात आली. त्यांनी सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक खैरनार यांना दिली. त्यांनी सदर घटनेची माहिती नाशिक येथील आदिवासी विकास भवन कार्यालय व घोटी पोलीस स्टेशनला कळविले. संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. सदर मुलाचा मृतदेह झाडावरून खाली उतरवून घोटी येथील रु ग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला. घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी पो. निरीक्षक आडसुळ पुढील तपास करत आहे. सदर विद्यार्थ्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.