ग्रामीण पोलीस दलातील कॉन्स्टेबलची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:36 AM2021-11-15T01:36:15+5:302021-11-15T01:36:46+5:30
आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात नियुक्त असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय आंधळे (२७, मूळ रा. ठाणगाव, ता. सिन्नर) असे मयत पोलीस शिपायाचे नाव आहे.
नाशिक : आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात नियुक्त असलेल्या एका तरुण पोलीस शिपायाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांकडून केला जात आहे. अक्षय आंधळे (२७, मूळ रा. ठाणगाव, ता. सिन्नर) असे मयत पोलीस शिपायाचे नाव आहे.
आडगाव येथील पोलीस मुख्यालय वसाहतीमधील दहा क्रमांकाच्या इमारतीच्या नऊ क्रमांकाच्या खोलीत पोलीस कॉन्स्टेबल अक्षय आंधळे हे त्यांच्या पत्नीसह वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला हाेता. काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी दिवाळीनिमित्त माहेरी गेल्या. त्यामुळे आंधळे हे सध्या खोलीत एकटेच होते.
ते २०१८साली पोलीस दलात भरती झाले होते. अवघे तीन वर्षे पोलीस दलात नोकरीला झाली होती. आंधळे यांनी अचानकपणे गळफास का घेतला? यामागील निश्चित कारण अद्याप पुढे आलेले नाही. ग्रामीण भागातील युवा पोलीसाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलून आपला जीवनप्रवास संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.