शेतमजुराची स्वच्छतागृहात आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:25 PM2019-02-19T13:25:01+5:302019-02-19T13:25:24+5:30
वरखेडा: दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील जलसंपदा विभागाचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धोंडगव्हाण, ता. चांदवड येथील शेतमजुराने स्वच्छतागृहात गळफास घेवून आत्महत्या केली.
वरखेडा: दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील जलसंपदा विभागाचे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धोंडगव्हाण, ता. चांदवड येथील शेतमजुराने स्वच्छतागृहात गळफास घेवून आत्महत्या केली.
ओझरखेड धरणालगत जलसंपदा विभागाने पर्यटन केंद्राच्या परिसरातून ओझरखेड येथील काही ग्रामस्थांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले असता काहींंनी ता.१७ रोजी सांयकाळी परिसराची पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीने स्वच्छता गृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मिडीयातून फोटो व वर्णन टाकले असता, मृतदेहाची ओळख पटली. धोंडगव्हाणवाडी येथील दिनकर खंडु पवार, वय ५५ यांचा मृतदेह असून ते ता. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजेपासून घरातून कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. दिवसभर ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध करु न रात्री वडोळीभोई येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्र ार नोंदविली होती. तद्पासून कुटुंबीय नातेवाईक हे दिनकर पवार यांचे शोध घेत होते. दरम्याण येथील ग्रामिण रु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मुलाचा पंधरा दिवसांपूर्वी अपघात होवून गंभीर जखमी होवून कोमात गेला होता. त्यामुळे दिनकर पवार हे मानसिक धक्का बसला होता तसेच रु ग्णालयाचे बील व औषधाचारासाठी लागणार्या खर्च या विचाराने मानसिक तणावातून आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहे.