बागलाणच्या शेतकऱ्याची मुलीसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:33 AM2018-03-25T01:33:55+5:302018-03-25T01:33:55+5:30
बागलाण तालुक्यातील तताणीजवळील पिंपळ्यामाळ येथील आदिवासी शेतकºयाने आपल्या चारवर्षीय मुलीला गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील तताणीजवळील पिंपळ्यामाळ येथील आदिवासी शेतकºयाने आपल्या चारवर्षीय मुलीला गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सटाणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तताणीलगत असलेल्या पिंपळ्यामाळ पाड्यावरील आदिवासी शेतकरी आनंदा बापू चौरे (४०) याने गुरुवारी मध्यरात्री आपली चारवर्षीय मुलगी राणी हीस गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर सदर घटनेची माहिती सटाणा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बी.डी. पाटील हवा. के.टी. खैरनार नवनाथ पवार, कॉन्टे. सागर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.