इगतपुरीत चिमुरडीसह मातेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:52 AM2018-11-05T00:52:16+5:302018-11-05T00:52:36+5:30
इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सदर महिलेने वाडीवºहे पोलिसांना आत्महत्या करणार असल्याचे कळवूनही या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्याने पोलिसांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अस्वली स्टेशन येथील विनता वारे (३५) पतीसह गोंदे दुमाला येथे राहात होत्या. या दांपत्याला सोनाली (वय तीन वर्षे) मुलगी होती. मध्यंतरीच्या काळात वारे कुटुंब भातकापणीच्या कामासाठी खोडाळा तालुक्यात गेले होते. तेथे दांपत्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याबाबत विनता यांनी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र वाडीवºहे पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर व्यथित झालेल्या महिलेने रविवारी आपल्या तीनवर्षीय चिमुकलीसह स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेची पोलिसांना कल्पना असताना, दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याने पोलिसांची चौकशी व्हावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, संजय शिंदे आदींनी केली आहे.
काहीकाळ तणाव
रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाडीवºहे पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी करत नातलगांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर संध्याकाळी तक्र ार दाखल झाल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतले.