निफाड तालुक्यात दोघांची आत्महत्त्या

By Admin | Published: October 16, 2016 02:53 AM2016-10-16T02:53:30+5:302016-10-16T02:53:45+5:30

जिल्ह्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ७४

Suicide in Niphad Taluka | निफाड तालुक्यात दोघांची आत्महत्त्या

निफाड तालुक्यात दोघांची आत्महत्त्या

googlenewsNext

नाशिक : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या घटना थांबल्या नसून, निफाड तालुक्यातील दोघा तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७४ झाली आहे. त्यात एकट्या निफाड तालुक्याची संख्या २४ इतकी
आहे.
परशराम भिला सिरसाठ (३२) रा. खेड व चांगदेव अशोक खालकर (३५) रा. औरंगपूर अशी या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. सिरसाठ याने विष प्राशन करून तर खालकर याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या दोघांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या केली किंवा नाही याची चौकशी पोलीस करीत असले तरी, चालू वर्षात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७४वर पोहोचली आहे. आर्थिकदृष्ट्या सधन व संपन्न असलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. चालू वर्षात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्याखालोखाल मालेगाव- ९, बागलाण- ८, सिन्नर, नांदगाव प्रत्येकी ७, चांदवड- ५, दिंडोरी- ४, येवला, कळवण- ३, देवळा- २ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.

Web Title: Suicide in Niphad Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.