कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:53 AM2018-02-27T00:53:09+5:302018-02-27T00:53:09+5:30

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.

Suicide is not stopped even after debt relief! | कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

googlenewsNext

नाशिक : सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.  राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी तेच एकमेव कारण यामागील असू शकत नाही. भाजपा सरकारने ३२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. तसेच यापूर्वीच्या सरकारने साडेपाच हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. तरी राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. दरम्यान, महाजन यांनी स्वत:चा प्रवासही उलगडून दाखविला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जामनेरसारख्या गावाचा सरपंच होत पुढे सलग पाच वेळा विधानसभेसाठी जनतेनी मला निवडून दिले. जात, धर्म, पंथ या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिले नाही आणि त्याची मला गरज वाटली नाही व भविष्यातही वाटणार नाही. लोकाभिमुख कार्यासाठी मी वाहून घेतले व त्यासाठी मी पुढे असतो किंबहुना तो माझा मूळ स्वभावच आहे, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले. लोकांच्या आरोग्याची सेवा केली, राज्यात लाखो लोकांसाठी वैद्यकीय महाशिबिरे घेतली. नाशिकचा कुंभमेळा यशस्वीतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळविला व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असे महाजन यावेळी म्हणाले. मुखत्यारसिंह पाटील व पत्रकार श्रीमंत माने यांनी महाजन यांची प्रकट मुलाखत घेतली.
विवाहसमारंभ-आजारपणावर मोठा खर्च
आजारपण व लग्नसोहळ्यांचा शेतकºयांना फटका बसत असून, विवाहाचा थाटबाट सांभाळताना शेतकºयाला प्रत्येकी पंधरा लाखांचा खर्च येतो, असे निरीक्षण महाजन यांनी यावेळी बोलताना नोंदविले. विवाहावरील खर्च कमी कसा करता येऊ शकेल त्यादृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.
व्यायामामुळेच सुदृढ
आपण शाकाहारी असून, मद्यपान-धूम्रपानासह चहाच्या चवीपासूनही मी कोसो दूर आहे. दररोज व्यायाम केला नाही तर आजारी असल्यासारखे वाटते. व्यायामाची सवय व निर्व्यसनी असल्यामुळे मी सुदृढ राहिलो, असेही गुपित महाजन यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Suicide is not stopped even after debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.