तळेगावरोहीच्या तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 02:01 AM2022-04-29T02:01:42+5:302022-04-29T02:02:07+5:30

चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारात खंडोबा मंदिराजवळील रहिवासी व इयत्ता दहावीत शिकणारा शुभम राजाराम वाकचौरे (१७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातलगांनी शुभमच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत जोपर्यंत संशयितांना पकडत नाहीत तपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा असून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Suicide of Talegaon youth | तळेगावरोहीच्या तरुणांची आत्महत्या

तळेगावरोहीच्या तरुणांची आत्महत्या

Next
ठळक मुद्देप्रेमप्रकरणाचा संशय : नातेवाईक संतप्त : दहा जणांविरोधात गुन्हा

चांदवड : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारात खंडोबा मंदिराजवळील रहिवासी व इयत्ता दहावीत शिकणारा शुभम राजाराम वाकचौरे (१७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातलगांनी शुभमच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत जोपर्यंत संशयितांना पकडत नाहीत तपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा असून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यू अन्वये नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करीत शव चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी नातलगांनी शुभमच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. संशयितांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत त्याचे शव ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही त्यांनी पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय आवारात घेतला. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला असल्याची चर्चा आहे. शुभमने संशयिताच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची चर्चा तळेगावरोही येथे होती. याबाबत शुभमचे वडील राजाराम विश्वनाथ वाकचौरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता विजय बाळासाहेब भोकनळ याने त्याचे मित्र योगेश रमेश वाकचौरे, गणेश बाळू सोनवणे, विठ्ठल वसंत भोकनळ, अक्षय जेऊघाले, गोकुळ बबन भोकनळ, युवराज बबन भोकनळ, बाळासाहेब रामदास भोकनळ, अमोल अशोक भोकनळ, आकाश अशोक भोकनळ यांच्यासह घर गाठत शुभमने पुन्हा ‘त्या’ मुलीशी चॅटिंग केली तर जीवंत सोडणार नाही. माझ्याकडे पिस्तूल व तलवार आहे, असा दम देत निघून गेले. त्यानंतर पुन्हा रात्री साडेअकरा वाजता संशयितांनी शुभम व त्याचे वडील राजाराम वाकचौरे, आई सुनीता वाघचौरे, आजी सुमनबाई यांना मारहाण केली. तसेच २७ एप्रिल रोजी शुभम यास धमकीचे मेसेज केले. त्यामुळे २८ एप्रिल रोजी पहाटे दोन ते पाच वाजेदरम्यान शुभम याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. १० जणांविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत शुभमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी असा परिवार आहे.

 

Web Title: Suicide of Talegaon youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.