विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 11:08 PM2020-12-08T23:08:33+5:302020-12-09T20:52:08+5:30
नांदगाव : चिंचविहीर येथील शीतल अनिल गांगुर्डे (२२) या विवाहितेने घरी छताला दोरी लावून गळफास घेतला. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पती अनिल, दीर सुनील, सासू शांताबाई व सासरा रमेश गांगुर्डे यांनी शीतलचा वेळीवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दीपक सुरवाडकर व भूषण आहिरे पुढील तपास करत आहेत.

डॉ. आंबेडकरांना अभिवादन
नांदगाव : जायंटसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आंबेडकर चौक, नांदगाव येथे साजरी करण्यात आला.
प्रतिमापूजन करून त्यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. जगन्नाथ साळुंखे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. रमणलाल लोढा, उपाध्यक्ष श्रावण आढाव आदी सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असेही प्रसंगावधान
नांदगाव : अखिल भारतीय होलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी येवला रस्त्यावर अर्धा तास वाहनांच्या व ट्रॅक्टरच्या गर्दीत सायरन वाजवत असलेल्या रुग्णवाहिकेस सहकारी रुद्राक्ष सोनवणे, गोटू गेजगे यांनी पर्यायी मार्ग मोकळा करून दिला. वाहिकेत एक अत्यवस्थ रुग्ण होता. त्यांचे कौतुक होत आहे.
उसतोड कामगाराला मदत
नांदगाव : तालुक्यातील ढेकू तांडा येथील ऊसतोड कामगार प्रल्हाद फौजमल चव्हाण यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. प्रल्हाद चव्हाण दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना येथे जात असताना चान्देश्वरी घाटातील ट्रक उलटून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मंडळ अधिकारी जगदीश पाटील, संकेत कराळे, सुरेश पाढेकर, संदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला.