जळगाव नेऊर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:40 IST2020-12-02T22:27:48+5:302020-12-03T00:40:06+5:30
जळगाव नेऊर : येथील अर्जुन उर्फ किरण रंभाजी वाघ ( ३०) या तरुणाने बुधवारी (दि.२) आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

जळगाव नेऊर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देयेवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव नेऊर : येथील अर्जुन उर्फ किरण रंभाजी वाघ ( ३०) या तरुणाने बुधवारी (दि.२) आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार वसंत हेंबाडे, पोलीस नायक गंभीरे, पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल निकम तपास करत आहेत.