खून करून आत्महत्येचा बनाव आला उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:07 AM2019-10-31T01:07:04+5:302019-10-31T01:07:26+5:30

महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला.

 Suicide by suicide is revealed | खून करून आत्महत्येचा बनाव आला उघडकीस

खून करून आत्महत्येचा बनाव आला उघडकीस

Next

सिडको : महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला. संशयितांनी मयतास गळफास घेतल्याप्रमाणे लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात अंबड पोलिसांनी टोळीमधील संशयित गोपाळ शंकर कुमावत व त्याचे वडील शंकर बंडू कुमावत या दोघांना अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश दगा वानखेडे (रा. पांडुरंग कृष्णा रो-हाउस) येथे राहतात. सोमवारी (दि. २८) रात्री रमेश यांनी एका महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून त्याचा येथील काही लोकांशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २९) सकाळी यातील संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली.
या मारहाणीत रमेश यास गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी रमेशची त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर रमेश याने घरात गळफास घेतल्याचे येथील काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनीच त्याला तत्काळ (एमएच१५,डीएस५३०२) या चारचाकी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रमेशच्या मृतदेहाचे विच्छेदन डॉक्टरांनी केले असता त्याचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृत याने याबाबतची माहिती अंबड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रमेश यांचा भाऊ अमृत दगा वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाऊबीजेला भावाची भेट झालीच नाही
मंगळवारी भाऊबीजनिमित्त रमेश, अमृत हे दोघे भाऊ संगमेश्वर येथे बहिणीकडे जाणार होते. भावाने रमेश यास फोन केला असता त्याने फोन न उचलल्याने अमृत हा थेट बहिणीकडे जाण्यासाठी एकटाच निघाला, मात्र अर्ध्या वाटेतच त्याला भाऊ रमेश हा खूप सिरियस असल्याचा फोन आल्याने त्याने पुढील प्रवास रद्द करत जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. भावाची आतुरतेने वाट पाहणाºया बहिणीची भाऊबीजेला भावाची भेट झालीच नाही.

Web Title:  Suicide by suicide is revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.