शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:49 PM2017-10-22T23:49:32+5:302017-10-23T00:18:21+5:30

शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे़ यामध्ये दोन पुरुष व एका वृद्ध महिलेचा समावेश आहे़

Suicide by taking three people in different situations in the city | शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

Next

नाशिक : शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे़ यामध्ये दोन पुरुष व एका वृद्ध महिलेचा समावेश आहे़ भारतनगरमधील सकुबाई काशीनाथ काळे (७३, भारतनगर, शिवाजीवाडी झोपडपट्टी, नाशिक) या वृद्ध महिलेने रविवारी (दि.२२) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आत्महत्येची दुसरी घटना मखमलाबाद रस्त्यावरील शांतीनगर, रामकृष्णनगरमध्ये घडली़ प्रकाश वसंत म्हस्के (४२, रा़ साईलीला बंगला, फ्लॅट नंबर ६) यांनी शनिवारी (दि़२१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बंगल्याच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीच्या पाइपला नायलॉन दोरीद्वारे गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  आत्महत्येची तिसरी घटना इंदिरानगरमधील श्री गुरुदत्त हौसिंग सोसायटीत घडली़ शरद लहानू दाते (५१) यांनी शनिवारी (दि़२१) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़
दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicide by taking three people in different situations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.