पांगरी येथे तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:22+5:302021-06-06T04:11:22+5:30
वीकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद सिन्नर: शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनला काही भागांत प्रतिसाद, तर काही ठिकाणी चोरी छुपके दुकाने सुरू ...
वीकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद
सिन्नर: शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनला काही भागांत प्रतिसाद, तर काही ठिकाणी चोरी छुपके दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. कडक लॉकडाऊन संपल्यानंतर नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात काही दुकाने सुरू होती, तर काही ठिकाणी दुकाने अर्धवट उघडी ठेवण्याचे आल्याचे चित्र दिसून आले.
उड्डाणपुलाखाली रस्त्यावर साचले पाणी
सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासच्या उड्डाणपुलाखाली रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. बायपासचे काम झाल्यापासून पावसाळ्यात दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असते. त्याकडे ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिक व वाहनचालकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आरोग्य केंद्राला ६० हजारांची औषधे
सिन्नर: तालुक्यातील पंचाळे ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांची तुटवड्याची समस्या लक्षात घेऊन, १५व्या वित्त आयोगातून सुमारे ६० हजार रुपयांची औषधे उपकेंद्राच्या स्वाधीन केली. औषधसाठा उपलब्ध झाल्याने येणाऱ्या रुग्णांवर आता मोफत उपचार होणार आहे. पंचाळे उपकेंद्रास उजनी, दहीवाडी, पिंगळगाव, श्रीरामपूर व महाजनपूर अशी गावे जोडली आहेत.
कुंदेवाडीत अवैध धंदे बंद करण्याची मागणी
सिन्नर: तालुक्यातील कुंदेवाडी येथील अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना दिले. अवैध धंदे सुरू असल्याने गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सरपंच रतन नाठे, उपसरपंच विष्णू माळी व विजय दोडे यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.