जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:55 AM2017-09-29T00:55:09+5:302017-09-29T00:55:26+5:30

गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

Suicides of 85 farmers in the district | जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

Next

नाशिक : गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
राज्य सरकारने चालू वर्षी शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ करूनही शोतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्ह्णात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ८५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने सरासरी प्रत्येक महिन्याला आठ ते नऊ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. सर्वाधिक आत्महत्या बागलाण व मालेगाव तालुक्यांत झाल्या आहेत. बुधवारी बागलाण तालुक्यातील वरचे टेंभे येथे राहणारी भारती दादाजी पाथरे (३५) या तरुण शेतकरी महिलेने स्वत:च्या शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या नावावर सोसायटीचे ७० हजार रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वीही निफाड तालुक्यातील करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण (४३) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्णात यंदा दोन शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्णात ८७ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या. यंदा जून महिन्यापासूनच जिल्ह्णात समाधानकारक व सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झालेला असतानाही शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेचे प्रयत्न कागदोपत्रीच ठरले आहे.

Web Title: Suicides of 85 farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.