देवघटच्या शेतकºयाची कर्जामुळे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:42 AM2018-01-28T01:42:08+5:302018-01-28T01:42:45+5:30
कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची शनिवारी भेट घेऊन सांत्वन केले आहे.
ंमालेगाव : कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची शनिवारी भेट घेऊन सांत्वन केले आहे. भामरे यांच्या नावावर पाच एकर शेतजमीन आहे. त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली तसेच सोसायटीचे ३५ हजार रुपये कर्ज तसेच काही हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड
कशी करायची या विवंचनेमुळे भामरे वैफल्यग्रस्त बनले होते. यामुळे त्यांनी दहिवाळ शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, शनिवारी तहसीलदार देवरे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गावित यांनी आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच गावात सभा घेऊन शेतकºयांचे समुपदेशन केले आहे. या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.