खडकजांब येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:22 AM2018-04-02T01:22:07+5:302018-04-02T01:22:07+5:30
चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकºयाने स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. शांताराम रात्री घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांचा मृतदेह दिसला.
शांताराम गुंजाळ यांच्याकडे सोसायटीचे एक लाख रुपये आणि एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी घेतलेले चार लाख रुपये कर्ज होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते काही दिवसांपासून होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेतदेखील त्यांच्या कर्जाचा समावेश झाला नाही त्यामुळेच शांताराम यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे नातलगांनी सांगितले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. वडाळीभोई पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे.