कामाच्या तणावामुळे मनपा सहायक अधिक्षकांची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:59 PM2018-08-02T16:59:14+5:302018-08-02T17:00:03+5:30
‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे.
नाशिक : महापालिके च्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहायक अधिक्षक संजय दादा धारणकर (४७) यांनी राहत्या घरी गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील ऋषिकेश टॉवरमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरामध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांना काही प्रमाणात दुखापत झाली होती. त्यामुळे धारणकर हे मागील काही दिवसांपासून रजेवर होते. ते बुधवारी (दि.१) नोकरीवर रुजू झाले होते. त्यांनी गुरूवारी (दि.२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धारणकर यांनी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्त्या केली.
‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे.
त्यांना राहत्या घरून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.
ते अनुकंपावर वयाच्या १८व्या वर्षी महापालिकेच्या सेवेत भरती झाले. त्यांनी सुमारे २२ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने संपुर्ण महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांनी पंचनामा केला असून पुढीत तपास सुरू आहे.