दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:26 AM2018-12-16T01:26:42+5:302018-12-16T01:26:58+5:30

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आणखी दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ झाली आहे. या महिन्यात पंधरा दिवसांतच नऊ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे.

Suicides of two farmers | दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Next
ठळक मुद्देसंख्या १०८ : पंधरा दिवसांत नऊ घटनांची नोंद

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आणखी दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ झाली आहे. या महिन्यात पंधरा दिवसांतच नऊ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे.
मालेगाव तालुक्यातील मौजे वजीरखेडे येथे नीलेश धर्मराज ह्याळीज या तरुण शेतकºयाने त्याच्या वजीरखेडे येथील विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या नावावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे चार लाखांचे कर्ज आहे. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे राहणारे प्रभाकर वाल्मीक हगवणे-पाटील (४०) या शेतकºयाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याची चौकशी सुरू असल्याने या संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे.
बागलाणमध्ये सर्वाधिक
जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ वर पोहोचली असून, वर्षभरात सर्वाधिक आत्महत्या नोव्हेंबरमध्ये १५ झाल्या आहेत, तर डिसेंबरच्या पंधरा दिवसांत नऊ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २०, तर दिंडोरीत १६ व मालेगावला १५ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.

Web Title: Suicides of two farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.