एक मुल तीस झाडे अभियान उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:42 PM2019-03-13T17:42:48+5:302019-03-13T17:45:22+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक मुल तीस झाडे हे अभिनव अभियान सुरू झाले आहे. हे अभियान केवळ याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरताच मर्यादित न राहता भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पोहोचले पाहिजे. कारण पृथ्वीचे वाढत असलेले तापमान आणि वातावरणातील प्रतिकुल बदल ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी हे अभियान क्र ांतिकारी आहे, असे मत संदीप विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रोफेसर एन. रामाचंद्रन यांनी व्यक्त केले.

कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना राबवित असलेल्या एक मूल तीस झाडे या अभियानास त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे डॉ. शरद बिन्नोर, प्रा. संदीप भिसे, प्रा. एस. एस. प्रसाद उपस्थित होते. मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनीही या अभियानास भेट दिली. त्यांनी ही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, दत्तात्रय पाटील, डॉ. एस. एस. घुमरे, प्रा. ज्ञानोबा ढगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.