बागलाण तालुक्यातील शेकडो वारकरी आळंदी ते पंढपूर पायी दिंडीसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:10 PM2019-06-25T18:10:47+5:302019-06-25T18:11:38+5:30

सटाणा : आषाढी एकादशीसाठी आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारी साठी आज मंगळवारी (दि.२५) बागलाण तालुक्यातून शेकडो वारकरी दिंडीसाठी बसस्थानकातून प्रस्थान केले. शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी श्रीफळ वाढवून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Sukdo Warkari of Baglan taluka leave for Alandi from Pandharpur on the way to Pandit | बागलाण तालुक्यातील शेकडो वारकरी आळंदी ते पंढपूर पायी दिंडीसाठी रवाना

आषाढी एकादशीसाठी आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडीसाठी बागलाण तालुक्यातील वारकºयांनी सटाणा बसस्थानकावरून प्रस्थान केले. त्याप्रसंगी शुभेच्छा देतांना लालचंद सोनवणे, उमेश बिरारी, कृष्णा रौंदळ, लक्ष्मण पवार आदि.

Next
ठळक मुद्दे राज्यात भीषण दुष्काळ असून पाऊस जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी दिंडीला चाललो असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.

सटाणा : आषाढी एकादशीसाठी आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारी साठी आज मंगळवारी (दि.२५) बागलाण तालुक्यातून शेकडो वारकरी दिंडीसाठी बसस्थानकातून प्रस्थान केले. शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी श्रीफळ वाढवून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
बागलाण तालुका व साक्र ी तालुक्यातून मंगळवारी शेकडो वारकरी आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केले. गेल्या अनेक वर्षापासून संत कृष्णा माऊली, जायखेडकर यांचे बागलाण तालुक्यातील शेकडो वारकरी भक्त दिंडी मध्ये सहभागी होतात. राज्यात भीषण दुष्काळ असून पाऊस जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी दिंडीला चाललो असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.
या दिंडीसाठी जेष्ठ महिला व पुरुष सहभाही झाले होते. शिवसेना उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे यांचे वतीने वारकºयांना अल्पोपहार व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. बागलाण तालुक्यातील कुठल्याही गावातून जर तीस वारकºयांचा गट असेल तर त्या गावातून पंढरपूरला जाण्यासाठी एस. टी. बस उपलब्ध करून देवू असे आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांनी यावेळी संगितले.
या प्रसंगी बच्चू सांगळे, शाम बगडाणे, सुरेश पवार, रवींद्र सोनवणे, कृष्णा रौंदळ, लक्ष्मण पवार, काकाजी ठाकरे, नानाजी अहिरे, साहेबराव अहिरे, दिलीप सोनवणे, काळू सोनवणे, किसान शिंदे, उत्तम बागुल, संजय निकम, अरु ण अहिरे, राजेंद्र हीरे, धनराज पाटील, वाल्मीक शेवाळे, भास्कर भामरे, सुरेखा ठाकरे, सुमन पवार, शकुंतला बिरारी, लता सावकार, इंदुबाई अहिरे, छायाबाई गांगुर्डे, बेर्बी देसले, हिरूबाई काकुळते आदि वारकरी उपस्थित होते.
 

Web Title: Sukdo Warkari of Baglan taluka leave for Alandi from Pandharpur on the way to Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :varkariवारकरी