सुखदा बेहेरे यांचा स्वर आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:58 PM2019-06-15T22:58:08+5:302019-06-16T00:58:44+5:30
सूर विश्वास’ या कार्यक्रमात आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गायन करताना सुखदा बेहेरे समवेत हर्षद वडजे, गौरव तांबे.
नाशिक : ‘सूर विश्वास’ या कार्यक्रमात आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या वतीने क्लब हाउस, सावरकरनगर येथे हा कार्यक्र म संपन्न गायिका सुखदा बेहेरे-दीक्षित यांच्या गायनाचे पाचवे पुष्प गुंफले गेले. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ हा अनोखा उपक्रम विश्वास गु्रपतर्फे सुरू करण्यात आला आहे. सुखदा बेहेरे यांनी मैफलीची सुरुवात ‘नटभैरव’ रागाने केली. बडा ख्यालचे शब्द ‘गुंज रही सब की रत’ होते. त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. त्याचे शब्द ‘सुरज चंदा जब तक फिरे’ होते. यातून स्वर, शब्द यांचा अनोखा आविष्कार समोर आला. ललत रागातील झपतालातील बंदिश त्यानंतर द्रुत बंदिश ‘जारे बलमवा’ सादर केली. हर्षद वडजे (हार्मोनियम), गौरव तांबे (तबला) हे साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. याप्रसंगी पं. मकरंद हिंगणे, विराज रानडे, विश्वास ठाकूर यांचा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास डॉ. मनोज शिंपी, राजाभाऊ मोगल, रमेश देशमुख, मिलिंद धटिंगण, प्रितम नाकील, स्वाती राजवाडे, डॉ. गिरीश वालावलकर, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. विनायक देवधर, मंजूषा चिमोटे, अनिल ओढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.