कळवण तालुक्यात रविवारी जाणवला शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:51+5:302021-04-12T04:13:51+5:30

कळवण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, ...

Sukshukat was felt in Kalvan taluka on Sunday | कळवण तालुक्यात रविवारी जाणवला शुकशुकाट

कळवण तालुक्यात रविवारी जाणवला शुकशुकाट

Next

कळवण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, शटरडाऊन बाजारपेठ अशा वातावरणात रविवार बंदला कळवण शहरात व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे, तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत.

रविवारी कळवण शहर व तालुक्यात शुकशुकाट जाणवला. पोलीस रस्त्यावर असल्यामुळे नागरिक घरात होते आणि रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.

कळवण शहरात शुक्रवारी रात्री ८ पासून सुरू झालेली शांतता रविवारच्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. शिवाय, सोमवारपासून पुन्हा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनेने जनता कर्फ्यू पुकारल्यामुळे आता रविवार, दि. १८ पर्यंत कळवणच्या मेन रोडवर नीरव शांतता दिसेल.

कळवणच्या मेन रोड, बसस्थानक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, गांधी चौक, गणेशनगर, शिवाजीनगर, ओतूर रोड अशा सर्व ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते. शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी या परिसरात शुकशुकाट होता. रस्ते, चौक, भाजी मंडई सर्व ओस पडलेली होती.

वीकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवार सकाळपासून शहरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकच बाहेर न पडल्यामुळे पोलिसांनी कधी सावली तर कधी उन्हात उभे राहून जागता पहारा दिला. त्यामुळे रस्ते ओस पडले, वाहनेदेखील रस्त्यावर दिसली नाही. सर्व खासगी वाहतूकदेखील बंद होती. नागरिक घरात राहिल्यामुळे अपवाद वगळता वाहने रस्त्यावर दिसली.

वीकेण्ड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून सकाळपासूनच कळवण शहरात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांनी पोलीस यंत्रणेची मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.

शासनाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने ठरावीक व्यक्ती वगळता सर्व मार्गावर शुकशुकाट पसरला होता. अधूनमधून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच चारचाकींना करडी नजर असलेल्या पोलिसांकडून हटकण्यात येत होते. प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस चांगलीच समज देत होते.

फोटो - कळवणच्या मेन रोडवर पोलीस यंत्रणा तैनात.

Web Title: Sukshukat was felt in Kalvan taluka on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.